रायगड ते रत्नागिरी हा कोकणपट्टा म्हणून संबोधला जातो.
कोकणातील रत्नागिरी हा जिल्हा कायमच पर्यटकांना आकर्षित करत असतो.
पण 'रत्नागिरी' या शब्दाचा खरा अर्थ काय?
स्वतःला रत्नागिरीकर किंवा कोकणी माणूस म्हणवून घेणाऱ्या 90% लोकांना ही गोष्ट माहित नाही.
'रत्नागिरी' हा शब्द दोन शब्दावरुन तयार झाला आहे. 'रत्न' आणि 'गिरी'.
रत्न म्हणजे मौल्यवान वस्तू, खडक.
गिरी म्हणजे पर्वत किंवा डोंगर असा होय.
रत्नागिरी या शब्दाचा अर्थ आहे रत्नांचा डोंगर आणि खनिजांचा प्रदेश.
प्राचीन काळात रत्नागिरीत अनेक मौल्यवान रत्ने, खनिजे आढळायची.
'रत्नागिरी' हे नाव भूगर्भशास्त्रातील मौल्यवान खनिजांवरुन देण्यात आलं.