Birthday Special: 12/12 ला बारामतीत जन्मलेल्या पवारांबद्दलच्या 12 खास गोष्टी; त्यांच्या शिक्षणापासून राजकीय प्रवासापर्यंत

पवार आज 84 वर्षांचे झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे.

1940 रोजी बारामतीमध्ये जन्म

शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीमध्ये झाला.

50 वर्षांपासून सक्रीय राजकारणात

शरद पवार हे मागील 50 वर्षांपासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत.

पहिल्यांदा निवडून आले

1967 साली शरद पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटवर पहिल्यांदा निवडून आले आणि आमदार झाले.

काँग्रेसपासून फारकत

1999 साली शरद पवारांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली.

4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

शरद पवार यांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहिला आहे.

माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि कृषीमंत्री

केंद्र सरकारध्ये युपीएच्या काळात शरद पवारांनी संरक्षण मंत्री आणि कृषीमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत.

'महाविकास आघाडी'चे प्रणेते

शरद पवार हेच 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या 'महाविकास आघाडी'चे प्रणेते होते.

बीसीसीआयचे अध्यक्ष

शरद पवार हे 2005 ते 2008 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्षही राहिले आहेत.

ICC चे अध्यक्ष

2010 ते 2012 दरम्यान शरद पवार अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते.

दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार

2017 साली शरद पवार यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषण प्रदान करण्यात आला.

शिक्षण किती?

शरद पवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण बारामतीमध्येच झालं.

VIEW ALL

Read Next Story