जे लोकं आयुष्यात यशस्वी होतात, त्यांनी स्वत:ला काही सवयी लावून घेतलेल्या असतात.
यशस्वी लोकांच्या सवयी जाणून घेतल्यास आपल्याला त्यादिशेने पाऊल टाकता येईल.
कोणत्याही गोष्टीत आधीच हार मानली नाही पाहिजे. आयुष्यात लक्ष्य ठरवावे आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यागाची तयारी ठेवावी.
तुमच्याकडे जे काम येईल ते तात्काळ हातावेगळे करा. आहे त्या कामातच वेळ घालवू नका.
खूप प्रयत्न करुनही अयशस्वी झालात तरी हार मानू नका. कदाचित पुढच्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळू शकते.
तुम्हाला किती वेळात लक्ष्य प्राप्त करायचंय? याची वेळमर्यादा आखा.
आळस कधीच माणसाला प्रगती करु देत नाही. त्याच्यापासून दूरच राहा.