किमान प्रवासात कमाल आनंद; ठाण्यापासून अवघ्या 67 किमीवर आहे निरव शांततेचं ‘हे’ ठिकाण

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

सहल

पावसानं चांगलाच जोर धरलेला असल्यानं अनेकांचीच पावलं सहलीच्या ठिकाणांकडे वळत आहेत.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

सुट्टी

नोकरदार वर्गाला फारशा सुट्ट्या मिळत नसल्यानं आपल्या शहरानजीक कुठेतरी जाण्यासाठी मग ठिकाणाची शोधाशोध होते आणि नेमकं कुठं जायचं हेच अनेकांना उमगत नाही.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

आश्चर्य

जाणून आश्चर्य वाटेल, पण ठाण्यापासून अवघ्या 67 किमी अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथं पावसाच्या दिवसांमध्ये जाणं म्हणजे स्वर्गसुख.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

आकर्षणाचा केंद्रबिंदू

अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारं हे ठिकाण इतकं कमाल आहे की इथं पावसाचे ढग, धुकं अगदी अंगणातही अवतरतं.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

कर्जत

डोंगरांच्या कुशीत दडलेल्या या ठिकाणाचं नाव आहे कर्जत. निसर्गाच्या अगाध लीला असणाऱ्या या ठिकाणी शहरी धकाधकीचा लवलेष इथं आल्यावर फारसा जाणवत नाही.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

ट्रेक

इथं राहण्यापासून ते अगदी साहसप्रेमींसाठी ट्रेक आणि ट्रेलच्याही सुविधा आहेत. स्थानिकांना यातूनच रोजगारसुद्धा मिळत आहे. हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू कर्जतला येण्यासाठी उत्तम. त्यातही पावसाळ्यात तर इथं येण्याचा आनंद काही औरच.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

प्रवास

ठाण्यासोबतच नवी मुंबई आणि मुंबईपासूनही कर्जत फारसं दूर नसल्या कारणानं अगदी छोटासा प्लान करायचा असल्यास हे ठिकाण तुमच्या यादीत असायलाच हवं.

Published by: Sayali Patil | Aug 29, 2025

VIEW ALL

Read Next Story