होळीमध्ये रंगांना खूप महत्व आहे. हा सण साजरा करण्यासाठी अनेक रंगांचा वापर केला जातो.
अशामध्ये बाजारात विकण्यासाठी आलेल्या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असण्याची शक्यता आहे.
रासायनिक रंग आपल्या आरोग्यासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
यामध्ये खाज सुटणे, चिडचिड होणे आणि अॅलर्जी यांसारख्या त्वचेच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
यासोबतच रासायनिक रंगामुळे डोळ्यांच्या आजारांचा देखील धोका वाढण्याची शक्यता असते.
अशा रंगाचा वापर केल्याने श्वसनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. दम्याचा झटका येण्याचा धोका वाढतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)