भारतीय रेल्वेचा Diamond Point कुठे आहे माहितीये का? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा

भारतामधील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

13 हजारांहून अधिक ट्रेन्स धावतात

भारतामध्ये रोज 13 हजारांहून अधिक ट्रेन्स वेगवेगळ्या मार्गांवर धावतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

भारत चौथ्या स्थानी

भारतामधील रेल्वेचं जाळं हे 68 हजार किलोमीटरचं आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या यादीमध्ये भारत चौथ्या स्थानी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

इथं सर्व बाजूने येतात ट्रेन्स

विशेष म्हणजे एवढं मोठं नेटवर्क असूनही भारतामध्ये केवळ एकच ठिकाण असं आहे जिथे सर्व बाजूने येणारे ट्रेन्सचे मार्ग एकमेकांना इंटरसेक्ट करतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

चारही बाजूंनी ट्रेन येऊ आणि जाऊ शकतात

अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास ही अशी जागा असते जिथे चारही बाजूंनी ट्रेन येऊ आणि जाऊ शकतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

इंटरसेक्शनला अनोखं नाव

भारतामध्ये चारही बाजूने ट्रेन येणाऱ्या या इंटरसेक्शनला डायमंड क्रॉसिंग असं म्हणतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

महाराष्ट्रात आहे हे ठिकाण

भारतामधील हे एकमेव डायमंड क्रासिंग महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

येथे होत नाहीत अपघात

चारही बाजूंनी ट्रेन येत असल्या तरी रेल्वेकडून या ठिकाणी अगदी सुनियोजित पद्धतीने वाहतूक हाताळली जात असल्याने अपघात होत नाहीत.

Published by: Swapnil Ghangale | Jun 15, 2023

VIEW ALL

Read Next Story