आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या विशेष सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठूरायाच्या नगरीत पोहोचले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरातून बाहेर येऊन हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत मिसळून त्यांच्याशी संवाद साधत, वारीनिमित्त केलेल्या सुविधा पुरेशा आहेत की नाही याचीही विचारपूस केली.
पंढरपूरच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांसमवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान अवताडे,आमदार राजू खरे यांची उपस्थिती होती.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये आतापासूनच वारकऱ्यांची आणि भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, आता संतमंडळींच्या पालखी आणि दींड्यासुद्धा या नगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
आषाढीच्या या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणानं सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून यंत्रणांनीसुद्धा कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.[सर्व छायाचित्र सौजन्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोशल मिडीया अकाउंट वरुन घेण्यात आले आहेत.]