1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र हा नैसर्गिक, भौगोलिक, ऐतिहासिक अशा अनेक बाबतीत परिपूर्ण आहे. तेव्हा राज्यातील अशा 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेऊयात, ज्यांना तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
महाराष्ट्रातील पुणे हे एक ऐतिहासिक शहर असून येथे सिंहगड, शनिवार वाडा, दगडू शेठ गणपती अशी अशी अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासारखी आहेत.
छत्रपती संभाजी नगरचे पूर्वीचं नाव औरंगाबाद असे होते. येथे दौलताबाद किल्ला, अजिंठा आणि एलोरा लेण्या, पाणचक्की, बीबी का मकबरा अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत.
कोल्हापुरा पन्हाळा, गगनबावडा ही अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी कोल्हापुरची महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा इथेच आहे. याशिवाय येथील रंकाळा तलाव सुद्धा कोल्हापुरचे आकर्षण ठरतो.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील हिलस्टेशन असून याला मिनी काश्मिर म्हणूनही ओखळले जातं. दरवर्षी हजारो पर्यटक महाबळेश्वरमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात.
कोल्हापुरा पन्हाळा, गगनबावडा ही अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी कोल्हापुरची महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा इथेच आहे. याशिवाय येथील रंकाळा तलाव सुद्धा कोल्हापुरचे आकर्षण ठरतो.
नाशिकला महाराष्ट्राची देवभूमी असं म्हटलं जातं. येथे त्र्यंबकेश्वर, पंचवटी, सप्तशृंगी, शिर्डी अशी अनेक तीर्थस्थळ आहेत.
माथेरान हे सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून हे मुंबई, पुण्यापासून खूप जवळ आहे. त्यामुळे विकेंडला इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
सातारा जिल्ह्यात कास पठार, कोयना डॅम, कोयना अभयारण्य, अजिंक्यतारा किल्ला अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत. दरवर्षी कास पठारवर फुललेली वनस्पती, फुलं पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटन इथे भेट देत असतात.
जंगल सफारीचा रोमांच अनुभवायचा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील हा एक व्याघ्र प्रकल्प 'ताडोबा' हे एक उत्तम ठिकाण आहे. येथील जीपमधून होणारी सफारी खरोखरच थरारक असते. यावेळी तुम्हाला जंगलातील विविध प्राण्यांचे दर्शन सुद्धा होते.
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलेली आहे. या कोकण किनारपट्टीवर गणपतीपुळे, रत्नदुर्ग किल्ला, आरे वारे बीच, दापोली, श्रीवर्धन, गुहागर, सिंधुदुर्ग अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा या ट्रेकर्सला नेहेमीच आकर्षित करतात. कळसुबाई, हरिशचंद्रगड, हरिहर किल्ला, राजमाची फोर्ट, कलावंतीण दुर्ग असे अनेक पर्वत, गडकिल्ले या सह्याद्रीच्या कुशीत आहेत.