पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील या धरणांना नक्की भेट द्या

कोयना धरण

मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील कोयनानगरचं (Koyna Dam) मुसळधार पावसामुळे सौंदर्य खुललं आहे. सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला लागलेत.

पवना धरण

पुणे शहरापासून फक्त 65 किमी अंतरावर पवना नदीवर पावना धरण पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. या धरणामध्ये पवना लेकमध्ये कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटरस्पोर्टसह इतर साहसी उपक्रमाचा आनंद घेता येतो.

पानशेत धरण

तुम्हाला पुण्यापासून एका दिवसात पिकनीक करत असाल तर तुम्ही पानशेत धरणाला भेट देऊ शकतात. स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स अशा वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे.

मुळशी धरण

पुण्यातील मुळशी धरण हे ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे त्याभोवती अनेक निसर्गरम्य परिसर पहायला मिळतोय. वर्षाविहारासाठी अनेक पर्यटक इथे येतात. पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी पौड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येतो.

खडकवासला धरण

खडकवासला धरण पुण्याजवळील सर्वात मोठ्या पिकनिक स्पॉट्सपैकी एक आहे. शुभ्र धुके आणि थंडगार वाऱ्यामुळे धरणाचा परिसर आल्हाददायी होतो. जो अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे आवर्जून येतात.

भुशी धरण

पुण्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भुशी धरण पाहण्यासाठी अनेकजण सुट्टींच्या दिवशी गर्दी करतात. गेल्या काही दिवसांपासून याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

काळजी घ्या

लोणावळा जवळील भुशी डॅमजवळ एकाच पाच कुटूंबातील पाच जण वाहून गेले आहेत. त्यामुळे जेव्हा अशा ठिकाणी फिरायला गेल्यावर काळजी घेणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story