कुठंतरी छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जायचंय पण फार वेळ नाहीय? हरकत नाही. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जी तुमच्या भटकंतीची सर्व हौस भागवतात
असंच एक ठिकाण अकोल्यापासून साधारण 6 तासांच्या अंतरावर आहे. डोंगरदऱ्यांच्या सानिध्ध्यात असणारं हे ठिकाण मनमोहक असंच.
स्वर्गाहूनही सुंदर अशा या ठिकाणी पावसाळ्यात येण्याची गोष्ट न्यारीच. पण इतर ऋतूंमध्येसुद्धा हे ठिकाण अनेकांनाच खुणावतं.
प्राचीन मंदिरं, सुरेख असा निसर्ग, डोंगररांगा आणि वाऱ्याच्या वेगानं पुढे जाणारे ढग अन् त्या ढगांची पडणारी सावली हे या ठिकाणाचं USP आहे असं म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात येणारं हे ठिकाण आहे इगतपुरी. अकोल्यापासून 450 किमी अंतरावर असणारं हे ठिकाण मुंबई, पुण्यासह ठाण्यापासूनही तुलनेनं जवळ आहे.
बाईक रायडिंगपासून ट्रेल आणि ट्रेकचा आनंद इथं घेता येतो. सोसाट्यानं वाहणारा वारा, उत्तम सूर्यास्त असा कमाल ताळमेळ इथं निसर्गानं साधल्याचं पाहायला मिळतं.
समुद्रसपाटीपासून 600 मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या या ठिकाणी आकाश निरभ्र असल्यास आकाश निरीक्षण पाहण्यासारख्या उपक्रमांचंही आयोजन केलं जातं.