पुणेकरांना 100 रुपयांत दिवसभर मेट्रोतून पाहिजे तितक्या वेळा प्रवास करता येणार आहे.

पुणे मेट्रोचे दोन टप्पे 1 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाले आहेत.

वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गावर पुणे मेट्रो धावत आहेत.

पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी खास पास लाँच केला आहे.

पुणे मेट्रोसाठी 100 रुपयांचा डेली पास लाँच करण्यात आला आहे.

100 रुपयांचा पास काढल्यावर पुणेकर दिवसभर मेट्रोतून पाहिजे तितक्या वेळा प्रवास करु शकतात.

सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या पासचा कालावधी असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story