हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीत स्वयं लक्ष्मीदेवीचा वास असतो
धार्मिक मान्यतेनुसार, घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-समृद्धी, शांती आणि सकारात्मकता येते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपाही मिळते
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप लावण्याची दिशा योग्य असायला हवी. चुकीच्या दिशेला रोप लावल्यास अशुभ फळ मिळू शकते
दक्षिण दिशेला यमदेवाचा वास असतो. त्यामुळं या दिशेला तुळस लावल्याने घरात मानसिक अशांती आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. या दिशेला तुळस लावल्याने सकारात्मक उर्जेचा संचार होतो
शास्त्रानुसार, दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ असते. असं केल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात असतो आणि सकारात्मक उर्जा वाढते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)