स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या नावाचा इतिहास काय?

महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असलेले सातारा आजही राज्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

एकेकाळी स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याला मोठा इतिहास आहे.

पण तुम्हाला माहितीये का शहराला सातारा नाव कसं पडलं ते?

सातारा शहराभोवती सात पर्वत आहेत. सात (सात) म्हणजे मराठीतील सात आणि तारा (तारा) म्हणजे पहाडी, ज्यामुळे 'सातारा' हा शब्द तयार झाल्याचे सांगण्यात येत.

मात्र, साताऱ्याच्या नावाबाबत अनेक दंतकथा आहेत.या शब्दांवरून सातदरा, सप्ततारा, महादरा या शब्दांवरून हे आले असावे, असंही काही जण म्हणतात

काही तज्ज्ञांच्या मते, अजिंक्यतारा येथील किल्ल्यावरील सप्तऋषींच्या मंदिरामुळे किंवा किल्ल्यास असलेले सतरा बुरूज वा द्वारे यांतील सतरा शब्दाचा अपभ्रंश होऊन सातारा हे नाव रुढ झाले असावे.

किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. पुढे ते सातारा झाल्याचे शाहूकालीन पत्रव्यवहारातून आढळते.

VIEW ALL

Read Next Story