कोण होणार नवे मुख्यमंत्री? बघा दावेदारांची यादी

महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या नेत्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. सध्या या भावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कोणकोणत्या नेत्यांची नावं आघाडीवर आहेत पाहूयात...

एकनाथ शिंदे

सध्याच्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील सर्वात प्रमुख पदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याची इच्छा उघडपणे अनेकदा बोलून दाखवली आहे.

उद्धव ठाकरे

तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचं अनेकदा संजय राऊत यांनी सूचक विधानांमधून म्हटलं आहे.

नाना पटोले

काँग्रेस समर्थकांचा एक गट विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले मुख्यमंत्री होतील असं म्हणताना दिसत आहे.

बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरातांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत आहे.

सुप्रिया सुळे

सध्या सुप्रिया सुळे यांच्याकडेही मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून बघितले जात आहे.

रश्मी ठाकरे

एवढंच नाही तर भावी मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरेंच्या नावाचेही बॅनर बघायला मिळत आहेत.

राज ठाकरे

मनसे समर्थकांनीही यापूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचे बॅनर झळकवले आहे.

गेल्या काही काळापासून राज्यातील राजकीय उलाढाल पाहता आता नवे मुख्यमंत्री कोण असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story