हृतिक रोशन - सुपर 30

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' एका बिहारी शिक्षकाची भूमिका कशी साकारेल? अशी शंका बऱ्याच जणांना होती. पण या सिनेमात आपल्या जबरदस्त अभिनयानं हृतिकने सर्वांचीच मनं जिंकून घेतली.

आमिर खान - तारें जमीन पर

राम निकुंभ नावाच्या कला शिक्षकाची भूमिका आमिरने प्रभावीपणे साकारली होती. इशान नावच्या एका डीसलेक्सिक मुलाला मदत करताना त्या दोघांचीही केमिस्ट्रि डोळे पाणावून जाते.

सुष्मिता सेन - मैं हूं ना

मिस चाँदनीच्या भूमिकेत सुष्मिताने सर्वांनाच घायाळ केलं होतं. सिनेमात तिने नेसलेल्या ऑर्गेन्झा साड्याही फारच गाजल्या होत्या.

शाहरुख खान - चक दे इंडिया!

हुद्दयाने शिक्षक नसला तरीही शाहरुखने साकारलेल्या कठोर कोच ची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती.

राणी मुखर्जी - हिचकी

नैना नावाच्या टुरेट सिंड्रोमशी लढा देणाऱ्या शिक्षिकेची भूमिका राणीने साकारली. तिचा क्षिकेपासून प्राचार्य बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय भावनिक रीतीने या सिनेमात दाखवलेला आहे.

बोमन इराणी - 3 इडियट्स

विरू सहस्त्रबुद्धे या भूमिकेत बमन इराणी यांनी एका उन्मत्त प्रचार्याची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती.

शाहरुख खान - मोहोब्बतें

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असा शिक्षक यावा असे या सिनेमात शाहरुखला पाहिल्यावर वाटते. प्रेमळ, समजून घेणारा अशा शिक्षकाच्या भूमिकेत शाहरुखने सर्वांची मनं जिंकून घेतली होती.

शाहिद कपूर - पाठशाला

राहुल नावाच्या इंग्रजीच्या शिक्षकाच्या भूमिकेत शाहिद फारच अप्रतिम होता. एका शिक्षकापेक्षा तो त्याच्या विद्यार्थ्यांचा मित्रच जास्त होता.

अर्चना पुरण सिंह - कुछ कुछ होता है

एका स्टायलिश शिक्षिकेची भूमिका अर्चना पुरन सिंहने खूपच उत्तम रीतीने साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story