20 जानेवारीला मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे.
3 कोटी आंदोलक मुंबईत येतील असं जरांगे म्हणालेत. खरोखरच मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत आले तर मुंबईचं चित्र 20 जानेवारीला कसं दिसेल याची झलक एआयच्या मदतीने अमित वानखेडे यांनी दाखवली आहे.
अमित वानखेडे यांनी '20 जानेवारीला मुंबईत मराठा समाज आल्यानंतर..' अशा कॅप्शनसहीत 10 एआय जनरेटेड फोटो शेअर केले आहेत.
वांद्रे-वरळी सी लिंकवर असं काहीसं चित्र 20 जानेवारीला दिसू शकतं.
'गेट वे ऑफ इंडिया'वर अशापद्धतीने भगाव्या झेंड्याचा समुद्र 20 तारखेला दिसू शकतो.
मराठा आंदोलन मुंबईत धडकल्यास मरीन ड्राइव्हचं चित्र असं काहीतरी दिसेल.
वानखेडेसारख्या मैदानात मराठा आंदोलक जमल्यास हे असं काहीसं चित्र दिसेल.
दक्षिण मुंबईतून मराठा मोर्चा पुढे सरकताना असं चित्र दिसू शकतं.
मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर हा मराठा मोर्चा असं काहीतरी चित्र 20 जानेवारीला दाखवू शकतो.
मुंबईतील रस्ते असे काहीसे भगवे झाल्याचं चित्र जानेवारीत दिसू शकतं.
20 जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाआधीच हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (सर्व फोटो - अमित वानखेडे यांच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)