दोन दिवसांच्या सुट्टीला जोडूनची रजा आली, की अनेकांचेच पाय नजीकच्या पर्यटनस्थळांकडे वळतात. प्रवासात फारसा वेळ न दवडता पोहोचता येईल अशा ठिकाणांचे पर्याय अशा वेळी शोधले जातात.
असं हे एक ठिकाण. डोंबिवलीपासून साधारण काहीच अंतरावर. म्हणजे अगदी गप्पा मारता मारतासुद्धा तुम्ही इथं पोहोचू शकाल इतकं जवळ.
डोंबिवलीपासून जवळपास 77 किमी म्हणजेच दीड तासांच्या प्रवास अंतरावर असणारं हे ठिकाण म्हणजे खंडाळा.
महाराष्ट्रातील काही लोकप्रिय गिरीस्थानांपैकी हे एक अनेकांच्याच आवडीचं ठिकाण. इथं आलेल्या प्रत्येकावर या ठिकाणाची विशेष भुरळ.
इथं असणाऱ्या वळणवाटा, डोंगर आणि गर्द झाडीमुळं या ठिकाणाची वेगळीच जादू प्रत्येत वेळी पाहायला मिळते.
समुद्रसपाटीपासून 622 मीटर उंचीवर असणाऱ्या या ठिकाणाला एकदातरी भेट द्या आणि इथल्या निसर्गसौंदर्यात हरवून जा.