पिझ्झा बाय द बे

मरीन लाईन्सचा कमाल व्ह्यू असणारं हे एक ठिकाण. इथं येऊन तुम्ही इंग्लिश ब्रेकफास्टसोबतच जीभेवर विरघळणारे पॅनकेक्स नक्की खा.

बेकहाऊस कॅफे

फोर्टमधील आणखी एक लक्षवेधी कॅफे म्हणजे बेकहाऊस. छान परदेशी इंटेरियर असणाऱ्या या कॅफेमध्ये मिळणारे सँडविच, विविध प्रकारच्या Egg Dishesh म्हणजे क्या बात.

काला घोडा कॅफे

मुंबईच्या फोर्टमध्येही बरेच कॅफे आहेत. यातलंच एक काला घोडा कॅफे. इथं पारसी पद्धतीचे पदार्थ तुमच्या प्रतीक्षेत असतात. साथ असते ती इंग्लिश ब्रेकफास्ट ट्रे ची.

ऑलिम्पिया कॅफे

कुलाब्यात सकाळच्या वेळी मस्तपैकी फेरफटका मारल्यानंतर, गेटवेवरून सूर्योदय पाहिल्यानंतर गाठा ऑलिम्पिया. इथं खिमा पाव, अंडा घोटाला, पानी कम चाय हे पदार्थ आवर्जून खा.

रामाश्रय

माटुंगा आणि करिरोड या मुंबईतील दोन महत्त्वाच्या ठिकाणी रामाश्रयची शाखा आहे. इथं दाक्षिणात्य पदार्थांची लज्जत एकदा चाखाच. पोडी इडली, पाईनॅपल शिरा आणि फिल्टर कॉफीची चव इथं नक्की चाखा.

लाडू सम्राट

Heart Of Mumbai म्हणजेचच लालबाग सुरु होतं अगदी तिथेच लाडू सम्राट उपहारगृह आहे. इथं येऊन तुम्ही शिरा, मिसळ, थालीपीठ, पियूष, चहा, साबुदाणा वडा अशा मस्त मराठमोळ्या न्याहारीचा आनंद घेऊ शकता.

Breakfast Places In Mumbai : अस्सल मराठमोळा ते इंग्लिश ब्रेकफास्ट मुंबईत कुठे मिळतो, पाहा आणि नक्की जा

Breakfast Places In Mumbai : मुंबईची खाद्यसंस्कृती अतिशय खास आहे. इथे मराठमोळ्या मिसळीपासून चक्क इराणी आणि इंग्लिश पदार्थांनाही तितकीच पसंती मिळते. चला पाहुया याच मुंबईची खाद्यसंस्कृती दाखवून देणाऱ्या Breakfast Places ना.

VIEW ALL

Read Next Story