मनिष मार्केट (Manish Market)

फॅन्सी चायनीज उत्पादनांसाठी सीएसटीजवळील मनिष मार्केट प्रसिद्ध आहे. अगदी घरगुती वस्तूंपासून ते एलसीडी स्क्रिन्सपर्यंत इथे सर्व काही मिळतं. तसंच हे एक होलसेल मार्केट असून इथून बऱ्याच गोष्टी एकत्र घेतल्यास फायदा होतो.

Apr 03,2023

हिंदमाता मार्केट (Hindmata Market)

दादर पूर्वेला असणारं हिंदमाता मार्केट हे दुकानं असली तरीही स्ट्रीट मार्केट म्हणूनच प्रसिद्ध आहे. विविध प्रकारच्या साड्यांची व्हरायटी इथे तुम्हाला मिळते. मुख्यत्वे भारतीय कपडे अर्थात इंडियन वेअरसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे.

धारावी मार्केट (Dharavi Market)

सायन स्टेशनला उतरून चालत जाता येतं. धारावी हे मुंबईतील सर्वात मोठं स्ट्रीट मार्केट आहे. इथे अनेक पर्यटकदेखील भेट द्यायला येतात. या ठिकाणी लेदर जॅकेट्स आणि बॅग्जना अधिक मागणी असून दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या आणि इतर गोष्टींसाठी हे मार्केट जास्त प्रसिद्ध आहे.

भुलेश्वर मार्केट (Bhuleshwar Market)

चर्नी रोड स्टेशनला उतरून चालत जाता येतं अथवा इथून शेअर टॅक्सीचीही सोय असणाऱ्या मार्केटेमध्ये लांबून लोक इथे खरेदी करण्यासाठी येतात. अगदी साडीपिनपासून ते इमिटेशन ज्वेलरी आणि कपड्यांसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त खरेदी इथून इमिटेशन ज्वेलरीची होते. लग्नासाठी लागणारी सर्व प्रकारची ज्वेलरी इथे मिळते.

नटराज मार्केट (Natraj Market)

ट्रॅडिशन-इंडियन क्लोथिंगसाठी मालाड पश्चिम येथील नटराज मार्केट पॉप्युलर आहे. अतिशय कमी जागेत स्ट्रिट शॉपिंग तसंच एसी शोरुमही आहेत. अनारकली सूट, साडी, लेहेंगा इथे बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध होतात. कपड्यांशिवाय फूटवेयर, ज्वेलरी, बॅग्सचीही मोठी रेंज इथे मिळेल.

गांधी मार्केट (Gandhi Market)

किंग्ज सर्कल (Kings Circle) इथे गांधी मार्केट असून ट्रॅडिशनल कपड्यांची मोठी रेंज इथे मिळते. सायन आणि माटुंगा इथून किंग्ज सर्कलला पोहोचता येईल. एम्ब्रोडरी इंडियन लेहेंगा आणि सूट्सचं जबरदस्त कलेक्शन इथे पाहायला मिळेल.

कुलाबा कॉजवे, कुलाबा (Colaba Causeway, Colaba)

ट्रेंडी कपडे, रंगीबेरंगी दागिने आणि प्राचीन घड्याळांपासून ते ब्रास ट्रिंकेट्स, बॅकपॅक आणि फॅशनेबल पादत्राणे या बाजारात सर्व काही मिळू शकते. तसेच चवदार जेवणासाठी तुम्ही बगदादी, बडेमिया किंवा लाइट ऑफ एशियासारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही जाऊ शकता.

हिल रोड, वांद्रे (Hill Road, Bandra)

हिल रोड हे फुटवेअर स्टोअर्स, हाय-स्ट्रिट शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्सने भरलेले आहे. ज्यामुळे ते रस्त्यावरील खरेदीसाठी योग्य ठिकाण बनले आहे. येथे खरेदीसाठी विक्रेत्यांशी सौदेबाजी कशी करावी हे माहित असले पाहिजे. तरच तुम्हाला स्वस्तात मस्त खरेदी करता येईल.

लोखंडवाला मार्केट, लोखंडवाला (Lokhandwala Market, Lokhandwala)

अंधेरीच्या जवळ स्थित, हे भव्य आणि आलिशान स्ट्रिट मार्केट आहे जिथे तुम्ही कधीही सेलिब्रिटीशी संपर्क साधू शकता. मार्केट ब्रँडेड स्टोअर्स, रस्त्यावर विक्रेते, कॅफे आणि निवासी इमारतींनी भरलेले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँड्स येथे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत.

लिंकिंग रोड, वांद्रे (Linking Road, Bandra)

स्वस्त आणि ट्रेंडी कपडे, दागिने आणि पादत्राणे येथील दुकानात उपलब्ध आहेत. हे ठिकाण मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्ट्रिट मार्केट आहे.

क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी (Crawford Market, CSMT)

हे ठिकाण गजबजलेले आणि पारंपारिक असले तरी कपडे आणि इतर फॅशनेबल गोष्टींसाठी ते खरोखर लोकप्रिय नाही. पण, तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत फॅन्सी होम डेकोर ॲक्सेसरीज आणि लाइफस्टाइल वस्तू नक्कीच मिळू शकतात.

VIEW ALL

Read Next Story