भारतीय महिला क्रिकेटरच्या आईची फसवणूक, एक फोन कॉल आणि लाखो रुपये गायब

Published by: Zee Team | Dec 12, 2023

पूनमची आई गीता गणेश राऊत यांना शनिवारी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या पतीचा मित्र असल्याचं सांगितलं.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

आपलं नावं अमित कुमार असून तुमच्या पतीकडून 15 हजार रुपये घेतले होते,ते परत करायचे असल्याचं त्या व्यक्तीने गीता राऊत यांना सांगितलं.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

याबाबत तुमचे पती म्हणजे गणेश राऊत यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी तुमचा नंबर दिला आहे UPI च्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर करायचे असल्याचं त्याने सांगितलं.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर गाती राऊत यांना एक मेसेज आला. यात 50 हजार रुपये अकाऊंटला क्रेडिट झाल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला आणि चुकून 50 हजार ट्रान्सफर केल्याचं त्याने सांगितलं.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

गीता राऊत यांनी UPIच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये परत करण्याचा प्रयत्न केला. पण यादरम्यान त्यांच्याच अकाऊंटमधून एक लाख रुपये गायब झाले.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

आपली फसवणूक झाल्याचं कळताच गीता राऊत यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

VIEW ALL

Read Next Story