तुम्ही अनेकदा टॅक्सी आणि कॅब हे शब्द वापरले असतील. सामान्यपणे हे दोन्ही शब्द एकमेकांना समानार्थी म्हणून वापरतात.
जगभरामध्ये टॅक्सी हा शब्द जास्त प्रचलित असून तो बहुतांश देशांमध्ये वापरला जातो.
मात्र कॅब आणि टॅक्सीमध्ये नेमका फरक काय आहे तुम्हाला माहितीये का? आपल्यापैकी जवळपास कोणालाच हा फरक माहिती नाही.
कॅब हा 'टॅक्सीकॅब' या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. हा अनेक देशांमध्ये अगदी क्वचितच वापरला जातो.
कॅब हा शब्द 'कॅबरीओलेट' वरुन आला आहे. म्हणजेच एक घोडा असलेली घोडागाडी. अशी घोडागाडी भाडेतत्वावर पूर्वी वापरली जायची.
तर टॅक्सी हा शब्द अंतर मोजण्याचं उपकरण असलेल्या टॅक्सी मीटरवरुन आला आहे.
म्हणजेच कॅब हा शब्द तुलनेनं जुन्या पद्धतीवर तर टॅक्सी हा शब्द नव्या मीटर तंत्रज्ञानावरुन जन्माला आलेला आहे
टॅक्सी आणि कॅब दोन्ही टर्ममध्ये प्रवास करण्यासाठी मिळणारं वाहन हे चालकासहीत मिळतं. या सेवेच्या मोबदल्यात ठराविक पैसे मोजावे लागतात.
म्हणजेच या दोन्ही शब्दांचा उगम वेगवेगळा असला तरी त्यांचा वापर सोयीस्करपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केला जातो.