सिद्धिविनायक मंदिरात 12 ऑगस्ट रोजी असलेल्या अंगारकी निमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या दिवशी पहाटे 3.15 वाजता महापूजा होईल.
त्यानंतर दिवसभर पूजासत्रे, श्रींचे दर्शन, भजने आणि आरती होणार आहे.
रात्री 11.50 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.
मात्र, मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी नाही.
सेवेमधीत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 सिद्धिविनायक हे स्थानकही यापूर्वीच खुलं झाल्याने भाविकांना दर्शनासाठी मेट्रोनेही येता येणार आहे.
तसेच भाविकांसाठी मोफत बससेवा देखील उपलब्ध आहे.