गिल्बर्ट हिल टेकडी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा थंड होऊन निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनली आहे.

Aug 02,2023


मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम परिसरात गिलबर्ट हिल टेकडी आहे. अंधेरी पश्चिमेला नवरंग सिनेमा आणि भवन्स कॉलेजच्या परिसरात ही टेकडी आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनला उतरुन अगदी पायी चालत जाता येवू शकते.


या टेकडीवर गावदेवीचे आणि दुर्गादेवीचे मंदिर आहे. टेकडीवरुन अथांग पसरलेला अरबी समुद्र तसेच मुंबईचा सुंदर नजारा पहायला मिळतो.


अमेरिकन भूशास्त्रज्ञ ग्रोवर कार्ल गील्बर्ट यांनी या दगडाचे संशोधन केले. यामुळेच ही टेकडी गिल्बर्ट हील नावाने ओळखली जातेय.


200 मीटर उंच असलेल्या या टेकडीवर जायला पायर्‍या आहेत.


गिल्बर्ट हील टेकडी ही अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी दिसते.


मुंबई महापालिकेने या टेकडीचा पर्यटन क्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे.

VIEW ALL

Read Next Story