नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगाने मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे.
जानेवारी महिन्यात एकट्या मुंबईमध्ये 10 हजार 467 घरांची विक्री झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. जानेवारी 2023 मध्ये 9001 घरांची विक्री झाली होती.
मागील वर्षी 9001 घरांच्या विक्रीतून सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून 692 कोटींची महसूल मिळाला होता.
यंदाच्या जानेवारी महिन्यात 10 हजार 467 घरांची विक्रीतून महाराष्ट्र सरकारला 716 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
यंदा मुंबईचा विचार केल्यास रिअल इस्टेटच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवाती चांगली झाली आहे.
मुंबईत पहिल्याच महिन्यात घर विक्रीने 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.