राज्याच्या राजकारणात म्हणजे महायुतीत सगळं काही आलबेल आहे असं नाही, त्याला कारण ठरलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जसजशी जवळ येतेय, तसतसं जागावाटपाचे तिढे आणि युत्या आघाड्यांमध्ये बिघाडी पाहायला मिळतेय.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही सुप्त संघर्षाला सुरूवात झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केलाय. तर शिरूरमधून शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेत.

शिंदे गटातील नेत्यांकडून तत्कालिन महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर निधीवाटपावरून बेछूट आरोप केले होते तेच अजित पवार महायुतीमध्ये राष्ट्रवादी फोडून आले.

अजित पवारांकडून चार लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटात पडद्याआडून खणाखणी सुरु झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story