मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची संपत्ती; 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी

सध्या सोशल मीडियावर एका भिकारीची चर्चा होतेय. तो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे.

मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट तर 8 कोटींची संपत्तीचा तो मालक आहे. तो महिन्याला किती कमावतो हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

त्यांची महिन्याची कमाई ही मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षाही जास्त आहे. तो दिवसाला 3 हजार रुपये तर महिन्याला 80 हजार रुपये फक्त आणि फक्त भीक मागून कमावतो.

याचं नाव भरत जैन असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आझाद मैदान परिसरात तो भीक मागतो.

तर मुंबईतील सर्वात महागड्या परळ भागात राहतो. तर त्याच कुटुंब स्टेशनरीचं दुकान चालवतं.

त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली असून त्याची दोन मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात.

VIEW ALL

Read Next Story