'या' गोष्टी टाळाच

वायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना

सिगारेट नकोच

तंबाखू, विडीचं सेवन टाळा. डासांसाठीची कॉईल, अगरबत्ती, धूप लावणं टाळा.

डोळे स्वच्छ करा

वाहनांवरून जाताना डोळ्यांवर चष्मा लावा. वाहत्या पाण्यानं सतत डोळे स्वच्छ करा. तासन् तास स्क्रीनसमोर बसू नका. कोमट पाण्यानं गुळण्या करा.

लाकूड जाळू नका

कोळसा, लाकूड, शेण, सुकी पानं, कचरा जाळणं टाळा.

घराबाहेर पडताय?

घराबाहेर पडण्याचा विचार असेल तर, स्वत:चं वेळापत्रक तयार करा. गरज असेल तर, दुपारी 12 ते 4 या वेळेतच घराबाहेर पडा.

इथं प्रवास टाळा

बांधकामं सुरु असणारा भाग, मोकळे रस्ते, वीटभट्टी परिसरात प्रवास करू नका.

दारं खिडक्या

सकाळी आणि संध्याकाळी दारं- खिडक्या उघडू नका.

चालणं फिरणं टाळा

हवेची पातळी खालावल्यामुळं सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी चालणं, धावणं, फेरफटका मारणं टाळा. बाहेर व्यायाम करणं टाळा.

VIEW ALL

Read Next Story