मुंबईत रस्ते, रेल्वे वाहतुकीची सद्यस्थिती काय? आताच्या मिनिटाची महत्त्वाची बातमी

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

मुंबई

Mumbai Rain : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या पावसानं गेल्या 24 तासांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. ज्यानंतर नव्या दिवशी नेमकी काय स्थिती... पाहा...

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

अतिमुसळधार पाऊस

बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला. शिवाय बुधवार, 20 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीपासून अधून मधून शहरासह उपनगरांमध्ये संततधार सुरुच आहे.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

जनजीवन पूर्वपदावर

असं असलं तरी सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येत असून, बहुतामंशी सामान्य आहे. तर, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट बस' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

यंत्रणा

पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on field) अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

आपत्कालीन परिस्थिती

आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

आवाहन

सदरच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास मदतीसाठी यंत्रणांना साद द्यावी.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

मदतसेवा क्रमांक

या मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

Published by: Sayali Patil | Aug 20, 2025

VIEW ALL

Read Next Story