मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात 26 टक्के साठा आहे.
अप्पर वैतरणा आणि विहार धरणात 20 टक्के, तर तुलसी धरणात 42 टक्के पाणीसाठा आहे.
या सातही धरणांमध्ये आजघडीला 3.74 लाख मिलियन लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 5.59 लाख मिलियन लिटर पाणीसाठा शिल्लक होता.
गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला तर, एप्रिल महिन्यातील हा निचांक आहे.
भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि अप्पर वैतरणा या धरणांमध्ये फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणीपातळी घटली.
मुंबईकरांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकतं.