पावसाळ्यातील भन्नाट AI Photos पाहाच
गेल्या काही वर्षापासून हवामान बदल हे सर्वांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबईला मोठा धोका असल्याचं दिसून येतंय.
मुंबई दरवर्षी दोन किलोमीटर समुद्रात जात असल्याचं आयआयटी मुंबईच्या एका सर्वेक्षणानुसार समोर आलं होतं.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे समुद्रालगतची अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जगातील 10 धोकादायक शहरांच्या यादीत मुंबईचा देखील समावेश आहे. त्यामुळे जर येत्या काही वर्षात मुंबईचं चित्र कसं असेल? याची चिंता सर्वांना लागलीये.
नुकतंच एआयने मुंबईतील येत्या वर्षातील दृष्य कसं असेल यावर काही फोटो शेअर केले आहेत.
मुंबईत येत्या काळात उभयचर ऑटोरिक्षा दिसतील, असं भाकित एआयने केलंय.
मुंबईचे रूपांतर एक डायस्टोपियन इंडियन सिटी असं होईल, अशी संकल्पना मांडली जात आहे.