रस्त्याने गाडी चालवताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
प्रत्येक चालकाला वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.
खाकीतील पोलीस तुमची गाडी तपासतात हे अनेकदा तुम्ही पाहिले असेल.
स्थानिक पोलिसांकडे गाडी तपासण्याचा अधिकार असतो का?
वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त ते तुमचे कागदपत्र तपासू शकतात.
अधिनियम 1988 ने त्यांना हा अधिकार दिलाय.
अनेकदा अधिकाऱ्यांना गाडीसंदर्भात सूचना मिळालेली असते.
काही खास कार्यक्रम असेल किंवा काही संदिग्ध आढळल्यास ते कागदपत्र तपासू शकतात.
स्थानिक पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव गाडीची कागदपत्रे तपासू शकतात.