स्टॅण्डअप कॉमेडीयन कुणाल कामरा त्याच्या विनोदामुळे युट्यूबवर प्रसिद्ध आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त पॅरेडी केल्याने कुणाल कामराने शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतलाय.
शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आलीय.
स्टॅण्डअप कॉमेडीयन कुणाल कामरा एका शोतून किती रुपये कमावतो? त्याचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्टनुसार, कुणाल कामरा कॉमेडी शोच्या माध्यमातून एका महिन्याला 12 ते 15 लाख रुपये कमावतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुणाल कामरा एका शोचे 3 ते 4 लाख रुपये घेतो.
कुणाल कामराचे नेटवर्थ 1.16 लाख ते 6.96 लाख यूएस डॉलर्सच्या जवळपास असल्याचे म्हटले जाते.
कॉमेडी करणं हा कुणाल कामराचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय तो युट्यूबवरुनदेखील कमाई करतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)