विजयी रॅलीनंतर चपल्ल, प्लॅस्टिक बाटल्यांचा खच... मरीन ड्राईव्हवरचं चित्र

Jul 05,2024


टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत भव्य स्वागत करण्यात आलं. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत खेळाडूंची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली


टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी मरीन ड्राईव्हला जमले होते. आपल्या हिरोंना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक होता.


मुंबईकरांच्या खेळाडूंवरच्या आणि क्रिकेट प्रेमाचं दर्शन यावेळी संपूर्ण जगाने पाहिलं. पण या भव्यतेचा आणखी एक चेहरा समोर आला आहे.


टीम इंडियाच्या विजयी रॅलीनंतर दुसऱ्या दिवशी मरिन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी कचऱ्याचा ढीग जमा झाला होता. प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, बूट, चप्पलचा अक्षरश: खच पडला होता.


मुंबई महानगरपालिकेकडून गुरुवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत सफाई अभियान राबवलं. तब्बल सात गाड्या भरून कचरा उचलण्यात आला. यासाठी दोन डंपरचाही वापर करण्यात आला.


रात्री 11.30 वाजता सफाई अभियानाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता अभियान संपवण्यात आलं. महापालिकेबरोबरच काही सामाजिक संस्थांनीही यात भाग घेतला होता.


विजयी रॅलीदरम्यान प्रचंड गर्दीमुळे 11 जणांना चक्कर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं

VIEW ALL

Read Next Story