वरळी चौपाटी हा समुद्र किनारा फार गजबजलेला नसतो. मात्र, येथे एक वेगळ्याच प्रकारची मन:शांती मिळते. दादर स्टेशन येथून बस अथवा टॅक्सीने येथे जाता येते.
मरीन लाईन्स हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. याला क्वीन नेकलेस म्हणूनही ओळखले जाते.
माहिम चौपाटीजवळ माहीम कोळीवाडा आहे. नुकतचं माहिम समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
जुहू चौपाटीला नेहमीच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. अंधेरी स्टेशन येथून बस अथवा रिक्षाने येथे जाता येते.
हाजीअली दर्ग्यापर्यंत जाण्याचा मार्ग समुद्रातून आहे. यामुळेच हाजीअली चौपाटी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते.
गोराई बीच बोरिवली येथे आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते. यामुळे हा समुद्र किनारा अत्यंत शांत समुद्र किनारा म्हणून ओळखला जाते.
गिरगाव चौपाटीला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकातून येथे जाता येते.
दादर चौपाटी हे अगदी सहज जाता येईल असे ठिकाण आहे. यामुळे येथे नेहमीच गर्दी पहायला मिळते.
वांद्रे रेक्लेमेशन येथीन वांद्रे वरळी सी लिंकचा एन्ट्री पॉईंट आहे. येथील समुद्र किनारा अत्यंत आकर्षक पद्धतीने सुशोभित करण्यात आला आहे.
वांद्रे बँडस्टॅंड हे वांद्रे पश्चिम येथे आहे. वांद्रे स्टेशनवरुन बस अथवा रिक्षाने येथे जाता येते. वांद्रे बँडस्टॅंड जवळ अनेक सेलिब्रिटींचे बंगले आहेत.
मुंबई हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. येथील समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालत असतात.