मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सायन स्थानकादरम्यान फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) गर्डर्स टाकण्याचे काम करण्यात येणार
यासाठी शनिवारी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
पहिला ब्लॉक भायखळा–परेलदरम्यान मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० या वेळेत असेल.
दुसरा ब्लॉक दादर–कुर्ला दरम्यान रात्री १.१० पासून पहाटे ४.१० या कालावधीत घेतला जाणार आहे.
या कामामुळे काही एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार असून, लोकल सेवेवरही त्याचा परिणाम होणार आहे.
हा ब्लॉक शुक्रवार, २६ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच १५ दिवस सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या वेळेत असेल
या दरम्यान अप व डाउन पनवेल मार्गावरील गाड्यांची हालचाल थांबवली जाईल.