शहर आणि जिल्ह्यामध्ये नेमका फरक काय? तुमचाही गोंधळ उडतोय?
General Knowledge : अनेकांनाच जिल्हा आणि शहरांमध्ये फरकच लक्षात येत नाही. तुम्हीही त्यातलेच आहात का?
या प्रश्नाचंही उत्तर मिळवा. एक बाब लक्षात ठेवा, शहर हा जिल्ह्याचाच भाग असतं. शहर आणि गाव जिल्ह्याचाच भाग असतात.
एका जिल्ह्यात कैक शहरं जोडली जाऊ शकतात. जिल्ह्यातील विकसित भागाला शहर म्हणून संबोधलं जातं.
बहुतांश लोकसंख्या आणि लोकवस्ती असणाऱ्या प्रांताला शहर असं म्हणतात.
शहरांमध्ये स्थानिक प्रशासनासह रुग्णालयं, महाविद्यालयं, शाळांची सुविधा असते.
जिल्हा म्हणजे शहरांतर्गत एक आकारानं लहान असणारा प्रांत किंवा प्रशासकीय भाग.