समुद्रकिनाऱ्यालगतची वाळू... खाण्यापिण्याची चंगळ असणारी ठिकाणं आणि एकच कल्ला... हे वर्णन वाचलं की अनेकांच्याच डोळ्यांपुढे चौपाटी उभी राहते.
फक्त मुंबईच नव्हे, तर पुणे आणि अगदी कोल्हापुरातही चौपाटी आहे बरं. पण, मग समुद्र नाही तर चौपाटी कशी? भेलपुरी मिळते ते ठिकाण म्हणजे चौपाटी? मुळात या शब्दाचा नेमका अर्थ आहे तरी काय?
चौपाटी या शब्दाची फोड केल्यास, चौ म्हणजे चार आणि पाटी म्हणजे नाला किंवा एखादा जलस्त्रोत.
ज्या ठिकाणी चार नाले एकत्र येतात, समुद्राशी एकरुप होतात त्या ठिकाणाला चौपाटी म्हणतात.
प्रत्यक्षात जगभरात या व्याख्येनिशी पाहिल्यास फक्त एकच चौपाटी अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे मुंबईतील गिरगाव चौपाटी. कमाल आहे ना....
इथून पुढं गिरगाव, दादर किंवा जुहू... कोणत्याही चौपाटीचा उल्लेख झाल्यास ही माहिती नक्की आठवा आणि इतरांनाही सांगा.