जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांचा समावेश होता. मुकेश अंबानींकडे एकाहून एक महागड्या वस्तू आहेत.
अंबानींची एकूण नेटवर्थ 9.10 लाख कोटी रुपये म्हणजेच 8940 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
अंबानींकडे भारताबरोबरच परदेशातही अनेक ठिकाणी संपत्ती आहे.
मुकेश अंबानींकडे बोईंग बिझनेस जेट-2 हे विमान आहे. या विमानाची किंमत 627 कोटी रुपये इतकी आहे.
मुकेश अंबानींकडे दुबईमध्ये जुमेराहमध्ये 640 कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे.
मुकेश अंबानींनी 2008 साली 961 कोटींनी इंडियन प्रिमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विकत घेतला होता.
अंबानींकडे असलेल्या आयपीएल टीमचं म्हणजेच मुंबई इंडियन्सचं व्हॅल्यूएशन 1 हजार 029 कोटी रुपये इतके आहे.
अंबानींकडे असलेली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे त्यांचं घरं आहे.
मुंबईत असलेल्या 27 मजल्यांच्या अँटेलिया नावाच्या घराची किंमत 15 हजार कोटींहून अधिक आहे.