सुनांनो, सासू कितीही चांगली असली

तरी 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

आज सासून सुनेला मायेचा सावलीत त्यांचं नातं जपताना दिसते. तुमचं नातं कितीही छान असलं तरी सासूला काही गोष्टी चुकूनही सांगू नका.

सासू सुनेच नात्यात दुरावा येऊ नये म्हणून सुनेने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आगे. त्या दोघींमध्ये गैरमसज निर्माण होतील अशा कुठल्या गोष्टी सांगू नयेत.

सासूला तुम्ही सगळं सांगत असाल तरीही नवऱ्यासोबत झालेले भांडण कधीही सांगू नये. कारण यातून तुमच्या नात्यात तणाव येऊ शकतो. आई ही मुलांबद्दल काहीही ऐकू शकतं नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

जसं म्हणतात ना की सासरच्या गोष्टी माहेरी सांगू नये. तसंच माहेरच्या गोष्टी कधीही सासरी खास करुन सासूला सांगू नयेत. माहरेची भांडणं, वाद विवाद याबद्दल सासूला सांगू नयेत, कारण यातून नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतो.

सासूला कधीही तुमच्या जुन्या प्रेमसंबंधाबद्दल सांगू नका. त्याशिवाय कोणी तुम्हाला मागणी घातली किंवा लग्नासाठी कोणी कोणी प्रस्ताव पाठवला सांगू नका. कारण भविष्यात त्यावरुन मतभेद आणि वाद होऊ शकतात.

तुमचं आणि सासूचं नातं कितीही चांगलं असलं तरी सासूच्या माहेरीच्या व्यक्तीसोबतच त्यांच्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलताना जपून बोला.

VIEW ALL

Read Next Story