जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय

जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.

हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील

छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम दाखवत राहा

जोडीदाराला खास वागणूक द्या. तुमचे प्रेम तुमच्या हावभावांतून त्यांना जाणवू द्या. त्यांच्या नकळत छान बेत आखा.त्यांना फिरायला घेऊन जा,भेटवस्तू घेऊन द्या. अश्या लहान गोष्टींतून अविस्मरणीय आठवणी बनवा.

एकत्र चांगला वेळ घालवा,एकत्र आवडत्या गोष्टी करा

प्रेम संबंध जोपासताना एकमेकांच्या आवडी-निवडी आणि प्राधान्यांचा आदर ठेवणे कोणत्याही नात्यात फार गरजेचे असते.तुम्हाला खरेदी , गर्दी ,मोठ्या रांगा आवडत नसतील पण तुमच्या सहचाऱ्याला ते आवडते तर त्यांच्याबरोर जा. प्रियकराबरोबर वरचेवर डेटला जा,एकत्र चित्रपट बघायला जा , एकत्र फेरफटका मारायला जा, या फार साध्या क्रिया असल्या तरी नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत.

जवळीक वाढवा

सहचाऱ्याबरोबर खाजगीत वेळ घालवा,एकमेकांच्या मनाची जवळीक वाढवताना शारीरिक जवळीकसूद्धा वाढवा. हात-हातात घेऊन गप्पा मारा, तुमच्या मिठ्ठीतून त्यांना प्रेमाची उब जाणवू द्या. नात्यातील रंजकता वाढू द्या. हवाहवासा वाटणारा वेळ घालवा.

त्यांच्या स्वप्नांना आणि ध्येय्यांना समर्थन द्या

हा उपाय तुमच्या प्रेम संबंधातील आपुलकी वाढवण्यास फार मदत करेल. सहचाऱ्याने त्यांची स्वप्ने तुम्हाला सांगितल्यावर ती पूर्ण करण्यासाठी सहचाऱ्याला सतत प्रोत्साहीत करा.त्यांना कळू द्या की स्वप्नपूर्तीच्या प्रवासात तुम्ही त्यांच्या बरोबर आहात.

सतत प्रशंसा करा

प्रिय व्यक्तीची प्रशंसा करणे, त्यांच्याप्रती आत्मियता दाखवणे हे प्रेम दर्शवण्यासाठी फार चांगले मार्ग आहेत,त्यांचे अस्तिव तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्यांना कळू द्या. तुमच्या सहचाऱ्याला त्यांचे व्यक्तिमत्त्व किती छान आहे, तुम्हाला ते का आवडतात, किती आवडतात हे सतत सांगत राहा.

VIEW ALL

Read Next Story