ज्योतिषशास्त्रानुसार विष योग हा अतिशय अशुभ योग मानला जातो.
मीन राशीत चंद्र आणि शनि ग्रहामुळे विष योग निर्माण झाला आहे.
हा योग 17 जुलैला 24 तास असणार आहे. याचा गंभीर परिणाम तीन राशीच्या लोकांवर होणार आहे.
कन्या राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुमची प्रतिमा डागाळू शकते. घरात भांडणे होतील. व्यवसायात नुकसान होईल.
कर्क राशीच्या लोकांना जेवण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागतील. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
कुंभ राशीच्या लोकांवर आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. पैसे उधार देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येईल. वाईट संगत टाळा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)