सध्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा ही एक मोठी गरज बनली आहे.
आचार्य चाणक्य यांनी कोणत्या चार व्यक्तींना उधार पैसे देऊ नका म्हटलं आहे ते पाहूयात.
जे नेहमी फसवणूक आणि बनावटगिरी करण्यात तज्ज्ञ असतात अशा लोकांना कधीच पैसे उधार देऊ नका.
ते वाईट काळात तुमच्याकडून पैसे घेतात आणि नंतर राग बाळगतात. त्यांना उपकाराची अजिबात जाणीव नसते.
तसेच बेजबाबदार आणि मूर्ख व्यक्तीला कधीच पैसे उधार देऊ नये. कारण कधीही तुमचे पैसे बुडवू शकतात.
लोभी व्यक्तीला कधीच उधार पैसे देऊ नये. कारण पैसे परत करण्यांच्या वेळी ते कधीही बदलू शकतात.
अहंकारी लोकांना पैसे उधार देणे टाळावे. असे लोक मनमानी पद्धतीने पैशाचा गैरवापर करतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)