फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये चाणक्य नीतिची ख्याती असून, त्यातील अनेक संदर्भ बऱ्याचदा उदाहरणस्वरुपात सांगितले जातात.
3 हजार वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या चाणक्य नीतिला आजही अनेक ठिकाणी महत्त्वं दिलं जातं. अशा या दिशादर्शक नीतिमध्ये वैवाहिक नात्याबाबतही काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
चाणक्त नीतिनुसार पत्नीला पतीचा अपमान कधीच सहन होत नाही. त्यामुळं एखाद्या प्रसंगी तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाल्यास त्याची वाच्यता पत्नीकडे करु नये. अन्यथा अपमान करणाऱ्या व्यक्तीविषयी पत्नीच्या मनात रोषाची भावा निर्माण होईल.
चाणक्य नीतिनुसार पतीनं कधी पत्नीला आपल्या अर्थार्जनाचा आकडा पूर्णत: सांगू नये आणि पत्नीला तिच्या अर्थार्जनाचा आकडा विचारू नये.
प्रत्येक व्यक्तीची एक पडती बाजू असते. पण, चाणक्य नीतिनुसार पतीनं कधीच आपली पडती बाजू पत्नीकडे बोलून दाखवू नये. अनावधानानं पतीच्या पडत्या बाजूला दुरूपयोग केला जाऊ शकतो. ज्यामुळं घरात वादंग माजू शकतं. त्यामुळं काही गोष्टी वैवाहिक नात्यात न बोलणं उत्तम. (वरील माहिती सामान्य मान्यता आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)