दान करणं ही चांगली गोष्ट मानली जाते. दानाला धार्मिक महत्त्व आहे.
मात्र सूर्य मावळल्यानंतर रात्रीच्या वेळी काही गोष्टींचं दान आवर्जून टाळावं असं शास्त्र सांगतं.
वास्तू शास्त्रानुसार कोणीही अशाप्रकारे रात्री दान केलं तर त्याला फार नुकसान होऊ शकतं.
सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री काही गोष्टी दान केल्यास त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊ शकतो, असं वास्तू शास्त्र सांगतं.
वास्तू शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कधीच दूध दान म्हणून देऊ नये. दुधाचा संबंध चंद्र आणि सूर्याशी असतो.
रात्री दुधाचं दान करणं अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक फटका बसू शकतो आणि घरातील सुख-समृद्धीला धक्का लागू शकतो.
सूर्यास्तानंतर दह्याचं दानही करु नये. असं केल्यास घरावर संकट येतं अशी मान्यता आहे.
दही हे शुक्राचं प्रतिक असतं. शुक्र हा सुख आणि वैभवाची देवता असल्यानेच रात्री दही दान देऊ नये असं सांगतात.
वास्तू शास्त्रानुसार, सूर्य मावळल्यानंतर कधीच मीठ दान म्हणून देऊ नये.
रात्री मीठ दान केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे वाद होऊ शकतात, असं वास्तू शास्त्राचं म्हणणं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)