प्रेमानंद महाराज त्यांच्या सत्संगमधून वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी त्यांच्या मनातील विचाराला योग्य दिशा देतात.
एका भक्ताने त्यांना विचारलं की, आपल्याला खरंच चांगल्या आणि वाीट कर्मांची फळं मिळतात का?
तो पुढे म्हणाला की, चांगले लोक संघर्ष करतात आणि वाईट लोक आनंदी असतात.
प्रेमानंद महाराज म्हणाले की, विश्व आपल्या कर्मांचा अगदी अचूक हिशोब ठेवत असतो. यात विलंब होऊ शकतो पण अन्याय होत नाही. आपण जे काही चांगले किंवा वाईट कार्य करतो त्याचे आपल्याला फळ मिळतं.
ते म्हणाले की, चांगली कृत्ये त्वरित परिणाम देत नसली तरी ती व्यक्तीच्या जीवनात शांती, स्थिरता आणि आध्यात्मिक समाधान आणते. त्यांचे मन आणि भाग्य शुद्ध असतं.
चांगल्या कर्मांचे फळ आपल्याला पुढील जन्मातही मिळतं.
वाईट कृत्ये सुरूवातीला आनंददायी वाटू शकतात. पण तीत आत दु:ख आणि अशांतता असते. माणसाने वाईट कृत्ये टाळली पाहिजेत.
ते म्हणाले की, देव न्याय करतो, तो भेदभाव करत नाही. तुम्ही तुमचे कर्म फक्त शुद्ध ठेवा आणि परिणामाची चिंता करु नका.
महाराज म्हणाले की, चांगली कृत्ये आशीर्वाद म्हणून परत येतात आणि वाईट कृत्ये धडा किंवा शिक्षा म्हणून परत येतात.