मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे.
मेष राशीच्या लोकांना पाण्याची भीती जास्त असते. मेष राशीचे लोक कमी आहार घेतात. मेष राशीचे लोक व्यर्थ आणि मिथ्या बोलण्यात आपला जास्त वेळ घालवतात.
मेष राशीचे लोक अत्यंत साहसी असतात. स्वाभिमानी आणि ध्येयवादी असतात.
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरु ग्रह शुभ मानला जातो. मेष राशीसाठी मंगल आणि शुक्र ग्रह मारक ठरतात. तर बुध प्रबळ मारक ठरतो. मेष राशीच्या लोकांचे पाय कमजोर असतात.
मेष राशीच्या महिला खूप चंचल असतात. त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मेष ही पुरुष जातीची मानली जाते.मेष राशीचे चिन्ह उत्कट आणि मजबूत आहे. त्याचा स्वभावावर देखील परिणाम होत असतो.