ऑगस्ट महिना सुरुवात झाली आहे. हा महिना काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
ऑगस्टमध्ये बुध, शुक्र, शनि, सूर्य इत्यादी ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल पाहिला मिळणार आहे.
याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवरही होणार आहे. पण 3 राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना घातक ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना करिअरपासून ते प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनापर्यंतच्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
ऑगस्ट महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या अन्यथा, नंतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतं. तुम्हाला तणाव जाणवणार आहे. शांतीसाठी, दर सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण करा.
ऑगस्टमध्ये धनु राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होणार आहे. कठोर परिश्रम करूनही तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमच्या योजनांनुसार काम करणे चांगले होणार नाही. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार.
ऑगस्टमध्ये मकर राशीच्या लोकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. सावधगिरी बाळगा आणि शहाणपणाने संभाषण करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसंच, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)