अद्वैत या नावाचा अर्थ आहे जो सगळा वेगळा आहे असा. तुम्हाला वाटतं की तुमच्या लेकाचं नावंही असं वेगळं असावं तर हे नावं नक्की ठेवा.
अथर्व म्हणजे ज्ञान. त्यातून अथर्ववेद म्हणून नाव प्रचलित आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमचा मुलगा कमालीचा हुशार आहे तर ठेवा अथर्व.
ईशानपुत्र या नावाचा अर्थ होतो, शंकरदेवाचा पुत्र.
गौरिक हे नावं जर का तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही आपल्या बाळाचे हे नावं ठेवू शकता.
हर्ष म्हणजे जो आनंदी आहे तो. हेही एक लोकप्रिय नावं आहे. तुमचा मुलगा सतत आनंदी राहावा असं वाटतं ना. मग हे नावं तुम्ही ठेवू शकता.
हेरंब म्हणजे शांत, विद्वान, आदरणीय. तेव्हा आपल्या लेकाचे हेही एक नावं तुम्ही ठेवू शकता.
ओजस म्हणजे प्रकाशानं भरलेला. त्यातून हे नावंही फार लोकप्रिय आहे.
प्रमोद याचा अर्थ आहे आनंद. तेव्हा या नावाचाही तुम्ही विचार करू शकता.