भगवद् गीतेमध्ये सांगितलेयत जीवनाला आधार देणारे उपदेश; लयास नेणारी कारणं...
Bhagwat Geeta Teachings : असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला आणि नकळतच मानवजातीला केलेल्या उपदेशांची नोंद गीतेमध्ये आहे.
महाभारत युद्धादरम्यान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करताना त्याला काही उपदेश दिले होते. याच भगवद् गीतेमध्ये जीवनाला आधार देणारे उपदेश आहेत. तर, मनुष्याला लयास नेणारी कारणंही नमूद करण्यात आली आहेत.
झोप, आळस, भीती आणि राग कामच मनुष्याला लयास नेतात असं श्रीकृष्ण म्हणतात. कामं टाळणं हे लयास जाण्याचं पहिलं लक्षण.
अत्यंत आनंदाच्या भरात किंवा दु:खाच्या प्रसंगात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असा उपदेश देवकीनंदन करतात.
बिकट परिस्थितीमध्ये कोलमडून जाणारी मंडळी कधीच यशस्वी होत नाहीत असं श्रीकृष्ण सांगतात. श्रीकृष्णाच्या मते ज्यावेळी एखाद्या व्यक्तीमध्ये स्वत:ला बदलण्याची ताकद नसते तेव्हा तो नशिबाला आणि देवाला दोष देतो.
पैसा येताच व्यक्ती स्वत:ला धनवान समजू लागतो. काहींना अहंकार ग्रासतो आणि ते मूळ आचरण विसरून जातात. श्रीकृष्णाच्या मते कधीच श्रीमंतीनं उतू-मातू नये. आपलेय पाय कायम जमिनीवर ठेवून सर्वांचाच आदर करावा.