गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे.
'गुरु' म्हणजे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, जीवनाचे योग्य मार्गदर्शन करणारा.
या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना नमन करून त्यांचे आशीर्वाद घेतो. या वर्षी गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
महर्षि वेदव्यास यांचा जन्म या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. तसेच या दिवशी अनेकजण गुरुंसह देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करतात.
गुरुपौर्णिमेला घरात भगवद्गीता आणल्यास किंवा तिचे पठण केल्यास मनाला शांती मिळते.
तसेच लाफिंग बुद्धा घरी आणायला विसरू नका. कारण यामुळे घरात शांती आणि आनंद वाढतो.
या दिवशी जर घरात श्रीयंत्र आणले तर ते शुभ मानले जाते. कारण ते देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)